---Advertisement---

Nitesh Rane : सर्वात मोठा गौप्यस्फोट, केली ‘ही’ मागणी

---Advertisement---
मुंबई : शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदेंना मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला होता. याबद्दल बोलताना आता भाजप आमदार नितेश राणे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. नारायण राणे यांनाही दोनदा मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचे ते म्हणाले आहेत.
आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत हा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, “जसं राणे साहेबांना मारण्याचा प्रयत्न केला गेला, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेलं आहे. म्हणून कधीतरी या सगळ्याची एकदा सीबीआय चौकशी व्हावी आणि उद्धव ठाकरेंची पूर्ण चौकशी व्हावी. कोणत्या कटात ठाकरेंचा काय सहभाग आहे, याचा तपास केला जावा,” अशी मागणी नितेश राणे यांनी यावेळी केली आहे.
तसेच नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांनादेखील दोनदा मारण्याचा प्रयत्न केला गेला. कुठलं औषध पाजून, कुठलं इंजेक्शन देऊन हे केलं गेलं याचीदेखील माहिती आमच्याकडे असल्याचे नितेश राणे म्हणाले आहेत. हेच आता एकनाथ शिंदे यांच्याबाबतीतही होत असल्याचे नितेश राणे म्हणाले आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment