“गणपती बाप्पा मोरया” नितेश राणेंनी दिलं चाकरमान्यांना गोड गिफ्ट; काय आहे?

मुंबई : गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी जिव्हाळ्याचा सण असतो. यासाठी लाखो चाकरमानी मुंबईहुन कोकणात जातात. मात्र, काही मिनिटातच आरक्षण फुल झाल्याने तिकीट मिळत नाहीत. यासाठी भाजप आ. नितेश राणेंनी गणपती बाप्पा मोरया म्हणत चाकरमान्यांना गोड गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त कोकणवासीयांना एक भेट मिळणार आहे, त्या भेटीचा लाभ घेण्याचे नितेश राणे यांनी आवाहन केले आहे.
नितेश राणे म्हणाले, “गणपती बाप्पा मोरया! चला मग यावर्षीदेखील मोदी एक्स्प्रेसने गावाकडे जायचंय ना? १७ सप्टेंबर या दिवशी देशाचे आदरणीय व लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोदी एक्स्प्रेस (Modi Express) सोडली जाणार आहे. कोकणवासीयांसाठी मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त ही एक खास भेट असणार आहे. कोकणवासीयांसाठी दरवर्षी गणपतीत मोदी एक्स्प्रेस सोडण्यात येते. मात्र यावर्षीची मोदी एक्स्प्रेस स्पेशल आहे.”
“कारण यंदा ती मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सोडली जाणार आहे. १७ सप्टेंबला दुपारी १२:३० वाजता दादरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन ही १७ एक्स्प्रेस दरवर्षीसारखी सुटणार आहे. बुकिंगसाठी ५ ते १० सप्टेंबर दरम्यान, कणकवली विधानसभेच्या सगळ्या मंडळाच्या अध्यक्षांना संपर्क करु शकता. दरवर्षीप्रमाणे प्रवाशांच्या खाण्यापिण्याची सगळी सोय याहीवर्षी करण्यात आलेली आहे.” अशी माहिती राणेंनी दिली.