देशातील टोल रद्द होणार! नितिन गडकरींनी दिली मोठी अपडेट

नागपूर : केंद्र सरकार लवकरच टोल यंत्रणा रद्द करण्याचा विचार करत आहे. त्या जागी आता नवीन प्रणाली येणार आहे, अशी माहिती भाजप नेते तथा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या X प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात दिली आहे.

टोल वसुलीची ही नवीन प्रणाली अथवा यंत्रणा उपग्रह आधारित असणार आहे. या यत्रणेंतर्गत, युजर्स महामार्गावर जेवढे किलोमीटर अंतर पार करतील, त्यानुसार त्यांच्या बँक खात्यातून आपोआप पैसे कापले जातील. यामुळे युजर्सना सेव्हिंगचीही संधी मिळेल. ही यंत्रणा लवकरच सुरू केली जाईल.

मार्च 2024 पर्यंत नवी प्रणाली लागू करण्यचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उद्दीष्ट होते. याच्या सहाय्याने टोल प्लाझावर लागणारा वेळ कमी होईल, असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते.