भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार येरवडा कारागृहात ‘स्थानबद्ध’

 भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या व पोलिस दप्तरी कुविख्यात म्हणून ख्याती असलेल्या जितेंद्र उर्फ मोनू रामदास कोल्हे (34, अमरनाथ नगर, भुसावळ) याच्याविरोधात एमपीडीएची कारवाई करण्यात आली असून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवार, 8 रोजी याबाबतचे आदेश काढल्याने शहरातील गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोल्हे यास पथकाने ताब्यात घेत पुण्यातील येरवडा कारागृहात गुरुवारी दुपारी तीन वाजता हलवल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, आगामी काळात आणखी काही गुन्हेगारी टोळ्यांसह काही उपद्रवींवर हद्दपारीसह एमपीडीएची कारवाई होणार असल्याची माहिती आहे.

कारवाईसाठी यांचे योगदान महत्त्वाचे
जिल्हा पोलिस अक्षीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, सहा.निरीक्षक हरीष भोये, गुन्हे शाखेचे एएसआय युनूस शेख इब्राहीम, हवालदार सुनील दामोदरे, हवालदार जयंत चौधरी, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, बाजारपेठ उपनिरीक्षक गणेश मुर्‍हे, हवालदार आत्माराम भालेराव, कॉन्स्टेबल योगेश महाजन यांच्या पथकाने संशयीताला ताब्यात घेत पुण्यातील येरवडा कारागृहात हलवले.