---Advertisement---

‘एआय’ शिकणाऱ्याचे नशीब चमकणार ; आयटीआयमध्ये कोणते आहेत नवीन कोर्स ?

---Advertisement---

नंदुरबार : एकेकाळी कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा शेवटचा पर्याय म्हणून पाहिले जाणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आता आपली ओळख पूर्णपणे बदलत आहेत. गेल्या पाच वर्षात शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रमांमध्ये झालेल्या क्रांतिकारी आयटीआयला उच्च शिक्षणानंतरही नोकरीची शाश्वती देणारा महत्त्वाचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. यंदापासून एआयसारखे अभ्यासक्रम आयटीआयमध्ये शिकवले जाणार आहे.

उच्च घेऊनही शिक्षण शासकीय नोकरी मिळेलच, याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी आयटीआयकडे वळले आहेत, नवीन कौशल्य शिकून स्वतःचा व्यवसाय टाकता येतो. शिवाय शासकीय, निमशासकीय नोकरीसाठीही हा अभ्यासक्रम उपयोगी ठरत असल्याने यंदा आयटीआयसाठी अनेक विद्यार्थ्यांनी मुलींसाठी विशेषतः कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा), ब्युटिशियन, फॅशन डिझाइन आणि टेक्नॉलॉजी, ड्रेस मेकिंग, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि मल्टिमीडियासारखे अभ्यासक्रम चालविले जातात.

जिल्ह्यात यंदा प्रवेशासाठी मोठी चुरस असून, एकूण जागांपैकी जवळपास ३३ टक्क्यांहून अधिक जागा पहिल्याच फेरीत भरल्या आहेत. या प्रवेशामध्ये मुलींचाही सहभाग आहे. त्यामुळे आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

आता मुलींनाही आयटीआय करायचयं

पूर्वी आयटीआयला केवळ मुलांचे क्षेत्र मानले जायचे. मात्र, आता मुलींचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. त्यांना केवळ पारंपरिक नोकरी नको असून, तंत्रज्ञान शिकून स्वतःच्या पायावर उभे राहणे पसंत करीत आहेत.

‘ई-व्हेइकल्स’वर आधारित ट्रेडससाठी जास्त धडपड

आजच्या तंत्रज्ञान-आधारित युगात ‘ई-व्हेइकल्स’ हे भविष्य आहे. हे ओळखून अनेक विद्यार्थ्यांनी ‘इलेक्ट्रिक व्हेइकल्स मेकॅनिक’ आणि ‘सोलर टेक्निशियनसारख्या नव्या ट्रेडससाठी जोरदार धडपड केली. जिल्ह्यातही हे ट्रेड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---