मुंबई : राज्यात एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषद मिलिंद नार्वेकर सदस्य यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भातला तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी उत्तर देताना म्हटले की, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मराठी भाषेतून ही परीक्षा घेण्याबाबतची शक्यता तपासून धोरण ठरवण्याचा अंतरिम आदेश १ सप्टेंबर २०२२ रोजी दिला आहे.
त्यानंतर आपली महाभारतीच्या वेबसाईटवर जनरल अॅग्रिकल्चर आणि अॅग्रिकल्चर सायन्स या परीक्षा इंग्रजीमध्ये होत असल्याचे मिलिंद नार्वेकर यांनी सांगितले.
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आता अभियांत्रिकी शिक्षण मराठीत घेण्यास परवानगी मिळाल्याने लवकरच या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध होतील.