तरुण भारत लाईव्ह । २३ मे २०२३। व्हॉटसपअपवर एखाद्याला चुकीचा मेसेज पाठवल्यास अनेकांची पंचाईत होते. आता मात्र काळजी करण्याचे कारण नाही. व्हॉटसपअपने त्यासाठी एडिट पर्याय उपलब्ध केला असून त्याद्वारे मेसेज पाठवल्यानंतर पुढील १५ मिनट पर्यंत तो एडिट करता येणार आहे. हे फीचर व्हॉटसपअपकडून लाँच झाले असून लवकरच ते सर्वाना उपलब्ध होणार आहे.
कसे वापरनर फीचर?
एखाद्याला चुकीने पाठवलेल्या मेसेजवर लॉंग प्रेस करून ठेवावे त्यानंतर स्क्रीनवर एडिट हा पर्याय येईल. एडिट बटन वर क्लिक केल्यानंतर संबंधित मेसेज एडिट करून नव्याने पाठवावा. एडिटचा पर्याय मेसेज पाठवल्यानंतर पंधरा मिनिटांपर्यंतच येईल त्यानंतर हा पर्याय येणार नाही.
व्हाट्सअप ने नुकतेच पर्सनल चार्ट लॉक करण्याची सुविधा नुकतीच उपलब्ध केली होती. त्यानंतर आता व्हाट्सअप ने एडिट बटनचे फीचर उपलब्ध केले आहे. एखाद्या वेळी चुकीने मेसेज पाठवले गेल्यास आतापर्यंत तो डिलीट करावा लागत होता. आता मात्र संबंधित मेसेज पुन्हा एडिट करून तोच सुधारित स्वरूपात पाठवता येईल.