---Advertisement---

Nandurbar News : आता निराधार बालकांनाही आधार कार्ड, जिल्हा साथी समिती स्थापन

---Advertisement---

नंदुरबार : रस्त्यावरील निराधार बालकांनाही आता आधार कार्ड मिळणार आहे. या कामासाठी जिल्हा साथी समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती विविध ठिकाणी आढळलेल्या १८ वर्षांखालील निराधार बालकांना आधार कार्ड देणार आहे. नंदुरबार जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखाली ही समिती १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबविणार आहे.

ज्यांच्याकडे कसलेले पुरावे नाहीत, अशा निराधार बालकांना आधार कार्डच्या माध्यमातून ओळख मिळणार आहे. नंदुरबार शहरातील रेल्वेस्थानकावर, बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात बेवारस बालकांची संख्या आढळून येते. त्यामुळे ‘बालहित सर्वोपरि’ या तत्त्वावर आधारित निराधार मुलांना सन्मानाची ओळख प्राप्त होऊन राहण्याचा अधिकार मिळावा, यासाठी राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार नंदरबार जिल्ह्यातील बालकांसाठी जिल्हा साथी समिती स्थापन केली आहे.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर आर. पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेली ही समिती नंदुरबार जिल्ह्यातील निराधार बालकांना आधार कार्डच्या माध्यमातून ओळख निर्माण करून देणार आहे. १५ ऑगस्ट या कालावधीत समिती हे काम करणार आहे. त्यामध्ये विधि सेवा यंत्रणा, स्थानिक प्रशासन, पोलिस विभाग, सामाजिक संस्था आणि बालकल्याण समित्या एकत्रितपणे काम करणार आहेत.

जिल्हा साथी समिती नंदुरबार जिल्ह्यातील दुर्लक्षित, बेघर, अनाथ, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना आधार नोंदणीद्वारे अधिकृत ओळख प्रदान करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. समितीमध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार, बाल संरक्षण अधिकारी, पोलिस अधिकारी, बालगृह /निवारागृह / अनाथाश्रम आदी शासकीय अशासकीय संस्था प्रतिनिधींचा समावेश असल्याचे विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव महेंद्र पाटील यांनी सांगितले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment