आता शिंदे गट नव्हे ‘शिवसेना’ म्हणायचं, शिंदे गटाचं पत्रक जाहीर

मुंबई : निवडणूक आयोगाने नुकतंच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं. निवडणुक आयोगाच्या निर्णयानुसार पक्षाचे नाव व चिन्ह शिंदेंना मिळाले. यानंतर आता शिंदे गटाकडून एक पत्रक काढण्यात आलं आहे.

काय म्हटलंय पत्रकात?
निवडणुक आयोगाच्या निर्णयानुसार पक्षाचे नाव व चिन्ह शिंदेंना मिळाले असून या पुढे माध्यमांनी शिंदेगट न उच्चारता ‘शिवसेना’ असे उच्चारावे, असं पत्र पक्ष सचिव संजय मोरे यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे.