---Advertisement---

आता टीसी झाले डिजिटल !

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्युज : देशभरात प्रवास करण्यासाठी भारतीयांची पहिली पसंती आजही रेल्वेला आहे. विविध मेल-एक्स्प्रेसने प्रवास करताना, प्रवासी आपल्या प्रवासाचा आनंद घेतात. मात्र, अनेकदा प्रवासी विनातिकीट प्रवास करतात किंवा सेकंड क्लासच्या पासवर पहिल्या वर्गाच्या डब्यामध्ये चढतात. अशा प्रवाशांवर तिकीट तपासनिसाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. काही प्रवासी मुकाट्याने दंड भरतात तर बरेच प्रवासी या कारवाईदरम्यान टीसीशी हुज्जत घालतात. हे वाद मोठ्या भांडणात रूपांतरित होतात. तर, कधी रागाच्या भरात टीसीला मारहाणही होते. हा सगळा प्रकार टाळण्यासाठी आता मध्य रेल्वेने नवी डिजिटल शक्कल लढवली आहे.

सुरळीत आणि पारदर्शक तिकीट तपासणी सुनिश्चित करण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी बॉडी कॅमेऱ्यांसह एसबीआय योनो ॲपद्वारे प्रवाशांकडून पेमेंट स्वीकारण्यासाठी यूपीआय, क्युआर कोड पेमेंट सिस्टीम सुरू करून नवीन तिकीट तपासणी उपक्रम सुरू केले. यामुळे तिकीट तपासणीस कर्मचाऱ्यांना मोठी मदत होणार आहे. घाईघाईत तिकीट काढायचे राहून गेले किंवा रोख पैसेही नाहीत, असे सांगत दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रवाशांना आता कारणे सांगायची सोयही राहणार नाही.

तिकीट तपासणीसांकडे (टीसी) दंडाची रक्कम यूपीआय वा क्यूआर कोड सिस्टीमद्वारे ऑनलाइन भरता येणार आहे; तसेच टीसीशी हुज्जत घालणाऱ्या प्रसंगी त्यांना मारहाण करणाऱ्या प्रवाशांचे चित्रीकरणही होणार आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी बॉडी कॅमेरा दिला आहे. बॉडी कॅमेरामुळे तिकीट तपासणीदरम्यान पारदर्शकता राखण्यास आणि गैरवर्तन वा हिंसक कृत्ये रोखण्यास मदत होणार आहे. या कॅमेरामुळे तिकीट तपासणीदरम्यान कोणतीही तफावत आढळून आल्यास किंवा प्रवासी-टीसीसंदर्भात तक्रारी आल्यास रेल्वेला चौकशी करता येईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---