आता आली देशातील पहिली सेल्फ ड्रायव्हिंग कार

नवी दिल्ली : देशातील ऑटोनॉमस कारची कॉन्सेप्ट अजूनही सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. अशा परिस्थितीत एका भारतीय स्टार्टअपने देशातील पहिल्या सेल्फ ड्रायव्हिंग कारचे अनावरण केले आहे. बंगळुरू स्थित एआय स्टार्टअप मायनस झिरोने झीपॉडचे प्रात्यक्षिक केले आहे. जागतिक स्तरावर दाखविण्यात आलेल्या इतर काही ऑटोनोमस वाहनांप्रमाणे ही कॉन्सेप्टदेखील टोस्टरच्या आकाराची आहे. कंपनीचा दावा आहे की, ही (Self-driving car) कार कॅमेरा-सेन्सर सूटमुळे सर्व प्रकारच्या परिस्थितीत आणि हवामानात चालवता येऊ शकते.

मायनस झिरो झेडपॉडचे सर्वात वेगळे फीचर्स म्हणजे त्यामध्ये स्टीअरिंग व्हील नाही. त्याऐवजी, ते ट्रॅफिकसह ड्रायव्हिंगच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी धोरणात्मकरित्या ठेवलेल्या उच्च-रिझोल्यूशन कॅमेर्‍याची एका सीरिजची मालिका वापरते. स्टार्टअपचे म्हणणे आहे की, या ऑटोनॉमस कारला लेव्हल 5 ऑटोनॉमीपर्यंत वाढविली जाऊ शकते, जी (Self-driving car) सेल्फ-ड्रायव्हिंग कारमध्ये सर्वाधिक आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, लेव्हल 5 ऑटोनॉमस असलेली कोणतीही कार कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चालविण्यास सक्षम आहे.

झेडपॉडचा कॅमेरा-सेन्सर सूट वाहनाच्या सभोवतालच्या रिअल-टाइम प्रतिमा कॅप्चर करू शकतो आणि त्यामध्ये एम्बेड केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) सिस्टमसह शेअर करू शकतो. यामध्ये वापरलेले एआय येणारे अडथळे टाळण्यास, कारला नेव्हिगेट करण्यास आणि त्याचा वेग नियंत्रित करण्यास मदत करते. ही (Self-driving car) कार सेन्सर्सऐवजी कॅमेरा टेक्नॉलॉजीवर काम करते. ऑटोनोमस कार कॅम्पसच्या आत, जसे की एक संलग्न आणि नियंत्रित क्षेत्राच्या आत खूप उपयुक्त ठरू शकतात.