---Advertisement---

NPF Board : अडावद पोलिस ठाणे परिसरात वृक्षारोपण

---Advertisement---

अडावद ता. चोपडा : येथील पोलीस ठाण्याच्या आवारात दि. १० रोजी राष्ट्रीय पोलीस मित्र व अडावद पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्दमाने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण विकास व राष्ट्रीय पोलीस मित्र चोपडा तालुका संघाचे अध्यक्ष, सदस्य आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पर्यावरण संरक्षण करण्याच्या दृष्टीने समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठीच वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ आजचाच विचार करून चालत नाही तर येणारा भविष्यकाळ विचारात घेऊन शाश्वत विकास करणे काळाची गरज आहे.

त्यासाठी वृक्षारोपण अत्यंत महत्त्वाचे आहे, हे लक्ष घेऊन राष्ट्रीय पोलीस मित्र व अडावद पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्दमाने वृक्षारोपण करण्यात आले. यात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यावेळी पर्यावरण विकास व राष्ट्रीय पोलीस मित्र चोपडा तालुका संघाचे अध्यक्ष ,सदस्य आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment