NTPC मध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! दरमहा मिळेल 50,000 रुपये पगार

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजेच या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मायनिंग लिमिटेडमध्ये मार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. एकूण १४४ जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी ntpc.co.in या वेबसाइटला तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा.

ही पदे भरली जाणार?
एनटीपीसीमध्ये नॉन-एग्जीक्यूटिव्हमध्ये पदभरती केली जाणआर आहे. यामध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये मानिंग ओवरमॅनमध्ये ६७ पदे, मॅग्जीन इनचार्जसाठी ९ पदे, मेकॅमिक पर्यवेक्षकासाठी २८ पदे, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षकासाठी २६ पदे, व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्ट्रकटर पदासाठी ८ पदे भरती केली जाणार आहे.

या पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळी आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने डिप्लोमा केलेला असणे गरजेचे आहे. १८ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

इतकी परीक्षा फी लागेल?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये फी भरावी लागणार आहे. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

अशी होईल निवड?
या नोकरीसाठी उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागेल. त्यानंतर कौशल्य चाचणी घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल.

इतका मिळेल पगार : या नोकरीसाठी वेतन पदानुसार देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना जवळपास ४०,००० ते ५०,००० रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.