पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या १०१ वर; महापालिकेकडून मोफत उपचारांची घोषणा

पुणे : शहर आणि परिसरात गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, आतापर्यंत १०१ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये ६८ पुरुष आणि ३३ महिलांचा समावेश आहे. या गंभीर आजारामुळे सध्या १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

गुलेन बॅरी सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल विकार असून, यामध्ये रुग्णाच्या स्नायूंवर परिणाम होतो. काही प्रकरणांमध्ये हा आजार अत्यंत गंभीर बनतो आणि रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. पुणे शहरात या आजाराची रुग्णसंख्या १०१ वर पोहोचल्याने प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

हेही वाचा : Extramarital Affairs News : दारु पाजली अन् नवऱ्याच्या छातीवर बसली; असे फुटले बिंग!

पुणे महापालिकेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार दिले जाणार असल्याची घोषणा महापालिकेकडून करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि कमला नेहरू रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा : OYO रुम बुक करून जोडपं करायचं ‘हे’ कांड, पाहून पोलिसही चक्रावले!

महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. या आजाराचे तात्काळ निदान आणि उपचार उपलब्ध असल्यास रुग्ण लवकर बरे होऊ शकतात. जीबीएसची लक्षणे दिसल्यास, जसे की स्नायूंमध्ये अशक्तपणा, हात-पाय हलवण्यात अडचण किंवा शरीराच्या काही भागांमध्ये बधिरता जाणवणे, तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाचे प्रयत्न

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाचा आढावा घेत, महापालिकेच्या आरोग्य विभागाला अधिक दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, नागरिकांना आजाराबाबत जागरूक करण्यासाठी जनजागृती मोहिमेदेखील राबवली जात आहे.