बीटचे पौष्टिक कबाब रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ७ एप्रिल २०२३। बीट ही पौष्टिक फळभाजी असूनही सलाडमध्ये वापरा किंवा भाजी करा मुलं बीट खायला कंटाळतातच. पण बीट पोटात तर जायलाच हवं, कारण ते खूपच आरोग्यदायी असतं. म्हणूनच कोशिंबीर किंवा नुस्ता उकडून बीट खाण्यापेक्षा आपण त्याचेच कबाब करून ते मुलांना खायला दिले तर…! मुलांना ते आवडेल. बीटचे पौष्टिक कबाब घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
तीन मध्यम आकाराचे बीट, तीन बटाटे, दोन चमचे आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, एक वाटी ब्रेडक्रम्ब्स, एक चमचा धणे पावडर, एक चमचा गरम मसाला, दोन कांदे बारीक चिरून बिनतेलाचे पाच मिनिटं परतून घेतलेले, तळण्याकरीता तेल व चवीनुसार मीठ.

कृती 
बीट व बटाटे वाफवून सालं काढून किसून घ्यावेत. मग त्यात आलं-हिरवी मिरची पेस्ट, ब्रेडक्रम्ब्स, धणे पावडर, गरम मसाला, परतलेला कांदा व चवीनुसार मीठ टाकून सगळं मिश्रण नीट एकत्रित करावं आणि हाताला तेल लावून त्याचे लिंबाएवढ्या आकाराचे गोळे बनवून ते थोडे तळहातावर थापून त्याचे कबाब करा. हे कबाब कडकडतीत तापलेल्या तेलात सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्यावेत आणि चटणीसोबत खायला द्यावेत. बीट आणि बटाट्यापासून तयार केलेले हे कबाब झकास लागतात.