पौष्टिक मेथीचे पराठे

तरुण भारत लाईव्ह । २७ ऑगस्ट २०२३। मेथी हि आरोग्यासाठी पौष्टिक असते. पण काहींना मेथी आवडत नाही. मग अशावेळी तुम्ही मेथीचे पराठे करू शकता. जे पौष्टिक आणि त्याचबरोबर चवीला छान असतात. मेथी पराठे घरी कसे बनवले जातात हे जाणून घ्या तरुण भारताच्या माध्यमातून.

साहित्य
गव्हाचं पीठ, मेथी, तिखट, मीठ, ओवा, हळद, लसूण पेस्ट.

कृती
सर्वप्रथम एका भांड्या मध्ये गव्हाचं पिठात मेथीची पाने एकजीव करावीत त्यानंतर या मिश्रणात  तिखट, मीठ, ओवा, हळद, लसूण पेस्ट हि सर्व सामग्री एकजीव करावी. हा पीठाचा गोळा थोडंसं तेल घालून चांगला मळून घ्या. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मऊ होईपर्यंत चांगलं मळून घ्या. यानंतर या पिठाचे गोल गोल गोळे करून ते पराठ्यासारखे लाटून घ्या.  नंतर तव्यावर थोडं तेल घालून पराठा तव्यावर दोन्ही बाजूनी भाजून घ्या आणि सर्व्ह करा मेथीचे पराठे.