पौष्टिक मिक्स डाळींचे वडे रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। मिक्स डाळींचे पौष्टिक वडे ही कर्नाटकची लोकप्रसिद्ध रेसिपी आहे. हे स्वादिष्ट डाळींचे वडे ब्रेकफास्टसाठी एक चांगला पर्याय आहेत. विविध डाळींचा समावेश असल्यामुळे या डिशमधून आपल्या शरीराला प्रोटीनची पूर्तता होते. डाळींचे वडे घरी कसे बनवले जातात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
भिजलेले मूग डाळ,  जिरे,  किसलेले नारळ,  कोथिंबीरीची पाने, हिरव्या मिरच्या, आले, हळद, हिंग, मीठ,  तूप,  भिजलेले तूळ डाळ, भिजलेले चणा डाळ

कृती 
सर्वप्रथम, हिरव्या मिरच्या, आलं, हळद, हिंग, जिरे व थोडंसं पाणी घालून सर्व सामग्री मिक्सरमध्ये वाटून जाडसर पेस्ट तयार करावी. त्यानंतर दुस-या मिक्सरच्या भांड्यात तूर डाळ, चणा डाळ व मुग डाळ वाटून बारीक पेस्ट बनवा आणि आधी केलेल्या पेस्टमध्ये ही पेस्ट चांगली मिक्स करा. आता या पेस्टमध्ये बारीक किसलेलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घाला आणि सर्व सामग्री व्यवस्थित एकजीव करा.

सर्व सामग्री चांगली मिक्स झाल्यानंतर त्याला वड्यांचा आकार द्या. पुढे, इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्या आणि त्यात वडे ठेवून २० ते २५ मिनिटे वाफेवर वडे शिजवून घ्या. तयार आहेत आपले टेस्टी व हेल्दी मिक्स डाळींचे वडे.