नव्याने स्थापित झालेल्या नशिराबाद नगरपरिषदेवर ओबीसी पुरुष होणार ‘नगराध्यक्ष’

---Advertisement---

 

नशिराबाद : नशिराबाद नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आले आहे. अशात आज नशिराबाद नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी पुरुष प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे.

नगराध्यक्षपदासाठी ओबीसी पुरुष प्रवर्ग आरक्षित झाल्यानंतर अनेक जणांचा हिरमोड झाला असून बाकी इच्छुकांना मात्र आनंद झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपासून इच्छुक उमेदवारांनी नशिराबाद शहरात निवडणुकीची तयारी सुरू केली असून, सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश, पोस्टर, बॅनर आणि प्रचाराचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शुभेच्छांचा आणि पाठिंब्याच्या संदेशांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), मनसे आणि AIMIM या पक्षांच्या गटांत कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. प्रत्येक गटाने आपल्या संभाव्य उमेदवारांसाठी गुप्त रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, AIMIM पक्षाच्या शहरातील कार्यकर्त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून संघटनवाढ आणि तरुण कार्यकर्त्यांना पुढे आणण्यावर भर दिला असून, या पक्षाकडून काही नवे चेहरे मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या शहरात निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला आहे.

सोशल मीडियावरच्या पोस्ट, शुभेच्छा संदेश आणि विविध बॅनर पाहता नागरिकांमध्येही चर्चा रंगू लागली आहे. “यंदा कोणाचा डंका वाजणार?” याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात आता नगराध्यक्ष हा ओबीसी प्रवर्गातून असल्याने अनेक समीकरणे बदलल्याचे दिसून येत आहे. त्यात प्रत्येक पक्षांना आता नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी चेहरे शोधावे लागणार आहेत.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---