नवी दिल्ली : झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणार्या या व्हिडीओमध्ये बन्ना गुप्ता एका तरुणीशी व्हिडीओ कॉलवर बोलत आहेत. तर ती तरुणी न्युड आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता विरोधी पक्षांनी बन्ना गुप्ता यांच्यावर टीका सुरू केली आहे. तर भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
बन्ना गुप्ता म्हणाले की, हा व्हिडीओ फेक आणि एडिटेड आहे. तसेच गुप्ता यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. गुप्ता म्हणाले की, माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी माझ्या राजकीय विरोधकांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, हा व्हिडीओ एडिट केला आहे. मी एफआयआर दाखल केला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी रविवारी संध्याकाळी मंत्री बन्ना गुप्ता यांचा अश्लील व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं की, महिलांचा आदर कसा करायचा हे काँग्रेस नेत्यांना कळत नाही. हेच काँग्रेसचं चारित्र्य आहे.
Jharkhand: BJP seeks minister's resignation over purported video chat with woman; he calls it fake
Read @ANI Story | https://t.co/XZxhXBKplm#Jharkhand #BJP #videochat pic.twitter.com/vkhmCvxijz
— ANI Digital (@ani_digital) April 23, 2023