ODI World Cup 2023: विश्वचषकापूर्वीच सुरू झाले युद्ध, वाचा काय घडलं?

भारतात क्रिकेट विश्वचषक सुरू होणार असून या स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तान क्रिकेट संघाला वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी अद्याप व्हिसा मिळालेला नाही, त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) पत्र लिहून हे प्रकरण सोडवण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानला 29 सप्टेंबरला पहिला सराव सामना खेळायचा आहे, त्याआधी टीमला 27 सप्टेंबरला हैदराबाद गाठायचे आहे. मात्र आतापर्यंत पाकिस्तानी संघ आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला व्हिसा मिळू शकलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते ओमर फारूक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून वर्ल्ड कपसाठी व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबत चिंता व्यक्त केली आहे.

पीसीबीने निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानी संघाला या सर्व अडचणींमधून जावे लागत आहे, तेही सर्वात मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जावे लागत आहे हे अतिशय दुःखद आहे. पीसीबीने सांगितले की, सराव सामन्यापूर्वी आम्हाला आमची योजना पूर्णपणे बदलावी लागली, कारण खेळाडूंना अद्याप भारतात जाण्याची परवानगी मिळालेली नाही.

पाकिस्तान क्रिकेट संघाला आधी काही दिवस दुबईत राहावे लागले आणि नंतर भारताला रवाना व्हावे लागले. पण भारताकडून व्हिसा न मिळाल्याने पाकिस्तानला आपली टीम बाँडिंग योजना रद्द करावी लागली आणि संपूर्ण योजना पुन्हा करावी लागली. पाकिस्तानला आपले दोन सराव सामने आणि दोन सुरुवातीचे साखळी सामने हैदराबादमध्येच खेळायचे आहेत, त्यामुळे आता संघ थेट येथे येणार आहे.

विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तानचे वेळापत्रक
२९ सप्टेंबर विरुद्ध न्यूझीलंड (सराव सामना)

३ ऑक्टोबर वि. ऑस्ट्रेलिया (सराव सामना)

6 ऑक्टोबर विरुद्ध नेदरलँड

10 ऑक्टोबर विरुद्ध श्रीलंका

14 ऑक्टोबर विरुद्ध भारत

20 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया

23 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान

27 ऑक्टोबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका

31 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश