ओमानच्या किनाऱ्यावर तेलवाहू जहाज बुडाले; 13 भारतीयांसह 16 जण बेपत्ता

ओमान किनाऱ्याजवळ समुद्रात तेलवाहू जहाज बुडाल्याची घटना समोर आली आहे. या जहाजावर १३ भारतीयांसह श्रीलंकेचे तीन नागरिक असे १६ क्रू मेंबर्स असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व बेपत्ता सदस्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु अद्याप यापैकी कोणाचाही शोध लागलेला नाही. या तेलवाहू जहाजाचे नाव प्रेस्टिज फाल्कन असे होते.

ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्रानुसार, या जहाजावर पूर्व आफ्रिकन देश कोमोरोसचा ध्वज होता.मंगळवारी हा तेलवाहू जहाज ओमानच्या इंडस्ट्रियल डुक्म नावाच्या मुख्य बंदराजवळ अचानक बुडाले. तेलवाहू जहाज बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या लोकांचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.

या सर्वांचा शोध सुरू आहे.ड्यूकम बंदर ओमानच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर आहे. हे बंदर सुलतानाच्या प्रमुख तेल आणि वायू खाण प्रकल्पांच्या अगदी जवळ आहे. यामध्ये एक प्रमुख तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. ड्यूकम हे ओमानचे एकमेव सर्वात मोठं बंदर आहे.