Old Pension Scheme: महाराष्ट्र राज्यातील शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी निमशासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारले आहे. या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार असल्याचे सांगितले होते. मात्र कर्मचाऱ्यांनी संप पुकारले आहे. दरम्यान, आता आम्ही सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक् नाना पटोले यांनी केलं आहे. ते एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत बोलत होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. राज्यात अंसतोष आहे. अर्थसंकल्पात 75 हजार नोकर भरतीची घोषणा करु असे सांगितले. पण सहा कंपन्यांना नोकर भरती करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिल्याचे नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसने सगळ्यांना सोबत घेण्याचे काम आतापर्यंत केलं आहे. देशासाठी काँग्रेसने समर्पण केल्याचे पटोले म्हणाले. भाजपविरोधात जे कोणी असतील ते सर्वच लोक महाराष्ट्रात एकत्र घेऊ. आमचं तळ्यात-मळ्यात अशी भूमिका नसल्याचे नाना पटोले म्हणाले. देशाची संविधान व्यवस्था वाचली पाहिजे त्यासाठी आमचा पुढकार असल्याचं पटोले म्हणाले.