जळगाव जिल्ह्यात गलोगल्ली रिव्हॉलवर – आ. एकनाथराव खडसे

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : जिल्ह्यात गुटख्याची तस्करी सुरू आहे. गावठी पिस्तूल गल्लोगल्ली मिळत आहे. यावर कुठेच पोलिसांचे नियंत्रण नाही. जळगाव जिल्ह्यात हप्त्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. या सर्वांवर नियंत्रण कसे राखण्यात येणार आहे, असा प्रश्न विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच आमदार एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी चाळीसगाव मधील ग्रामीण रुग्णालयाची वीज कट झाली आहे. बिल भरले नाही म्हणून ग्रामीण रुग्णालयातील वीज तोडू नये, अशी विनंती देखील केली.

राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. दंगे, खून, बलात्कार, चोऱ्या होत असून सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही. पोलिस यंत्रणा भ्रष्ट झाली असून लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप वाढलेला आहे. असे आरोप देखील त्यांनी केले.