मोठी बातमी ! २२ जानेवारीला सुट्टीविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासंदर्भात काही ठिकाणी पूर्ण दिवस सुट्टी तर काही ठिकाणी अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणारी कायद्याच्या चार विद्यार्थ्यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

हे चार विद्यार्थी MNLU मुंबई, GLC आणि निरमा लॉ स्कूलचे आहेत. ते कायद्याचे शिक्षण घेत आहे. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांचे उल्लंघन आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. कोणतेही राज्य कोणत्याही धर्माशी जोडू शकत नाही किंवा त्याचा प्रचार करू शकत नाही, असा युक्तिवादही या विद्यार्थ्यांनी केला.