---Advertisement---

गुरुपौर्णिमेच्या दिवशी आहेत विशेष योग; जाणून घेऊया शुभ मुहूर्त आणि शुभ योग

---Advertisement---

जळगाव : गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः॥
तिन्ही देवतांमध्येही गुरूचे स्थान सर्वोच्च आहे, असे संस्कृत श्लोकांतून सांगण्यात आले आहे. गुरु ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. तो परम ब्रह्म आहे, त्या गुरूला नमस्कार असो. असा श्लोकाचा अर्थ होतो. आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यावेळी गुरुपौर्णिमा ३ जुलै, सोमवारी साजरी होणार आहे. यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी ब्रह्मयोग आणि इंद्र योग तयार होतील. त्याचबरोबर सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योगही तयार होणार आहे.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या आशीर्वादाने धन, सुख, शांती आणि समृद्धीचे वरदान मिळू शकते, असे ज्योतिषी सांगतात. या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला म्हणून याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदु धर्मांत महर्षी व्यास आद्य गुरु मानले जातात. महर्षी वेद व्यास यांना श्रीमद भागवत, महाभारत, ब्रह्मसूत्र, मीमांसा याशिवाय १८ पुराणांचे लेखक मानले जाते. यामुळेच महर्षी वेद व्यास यांना आदिगुरूचा दर्जा प्राप्त झाला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांची विशेष पूजा केली जाते.

यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी ब्रह्मयोग आणि इंद्र योग तयार होतील. त्याचबरोबर सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योगही तयार होणार आहे. ब्रह्मयोग ०२ जुलै रोजी संध्याकाळी ०७.२६ ते ०३ जुलै दुपारी ०३.४५ मिनिटांनी असेल. इंद्र योग ०३ जुलै रोजी दुपारी ०३:४५ वाजता सुरू होईल आणि ०४ जुलै रोजी सकाळी ११:५० वाजता समाप्त होईल. या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करावी. स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. यानंतर पूजेचे व्रत घ्या आणि स्वच्छ ठिकाणी पांढरे वस्त्र पसरून व्यासपीठ बांधा. यानंतर त्यावर गुरू व्यासांची मूर्ती स्थापित करून त्यासमोर रांगोळी, चंदन, फुले, फळे आणि प्रसाद अर्पण करा.

गुरु पौर्णिमा शुभ मुहूर्त

गुरु पौर्णिमेची तारीख – ०३ जुलै २०२३
गुरु पौर्णिमा सुरू होते – ०२ जुलै, रात्री ०८:२१ पासून
गुरु पौर्णिमा पूर्णता – जुलै ०३, संध्याकाळी ०५:०८ पर्यंत

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment