दृष्टिक्षेप
– उदय निरगुडकर
Subansiri lower dam एका राज्यातून दुस-या राज्यात वाहणा-या नद्या हे संघर्षाचे मूळ असते हे कावेरी नदीने दाखवून दिले तसेच चीनमधून भारतात येणारी ब्रह्मपुत्रा हा भारत-चीन संबंधातील संघर्षाचा मुद्दा आहे.
आपले लक्ष फक्त सीमांवर होणा-या गलवानसारख्या चकमकींकडे असते. पण वाहणा-या नद्या हे किती मोठे अस्त्र असते, याची आपल्याला कल्पना नसते. subansiri lower dam नॅशनल हायड्रोलिक पॉवर कॉर्पोरेशन या भारत सरकारच्या जलविद्युत निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीच्या संचालकपदी नेमणूक झाली आणि मी पाणी, जलविद्युत अशा अनेक बाबींचा अभ्यास करायला लागलो. दरमहा होणा-या व्यवस्थापनाच्या बैठका, त्यातून होणारे आकलन यातून अनेक गोष्टी उलगडत गेल्या. subansiri lower dam सध्या आपल्या देशामध्ये एक विलक्षण गोष्ट घडत आहे. त्यामुळे ब-याच काळापासून असणा-या समस्या दूर होतीलच; पण वर्तमान आणि भविष्यासाठी एक देदीप्यमान अशी गोष्ट राष्ट्राला अर्पण केल्याचे समाधान मिळणार आहे.
subansiri lower dam ब्रह्मपुत्रा ही चीन, तिबेट, भारत, बांगलादेश अशा देशातून वाहणारी तब्बल २८८० किलोमीटर लांबीची महाकाय नदी. मानस सरोवराच्या आसपास अन्सी ग्लेसियर्स आहेत तिथे सर्वसाधारणपणे या नदीचा उगम मानला जातो आणि ही जागा पवित्र कैलास पर्वताच्या जवळ आहे. पुढे या नदीचा १७०० किलोमीटर प्रवास तिबेटमधून होतो, ९२० किलोमीटर प्रवास अरुणाचल आणि आसाममधून होतो आणि पुढे बंगालच्या उपसागराला मिळण्याआधी तिचा २६० किलोमीटरचा प्रवास बांगलादेशमधून होतो. ६१५ बिलियन क्युबिक मीटर इतका प्रचंड पाणीसाठा असलेल्या या नदीचे खोरे जगातील एक समृद्ध खोरे मानले जाते. subansiri lower dam या नदीमुळे फक्त पाणी मिळत नाही तर एक लोकजीवन, संस्कृती फुलते. तिबेटमधील ल्हासाच्या पूर्वेला चीन एक महाकाय धरण बांधत आहे. त्याला जोडूनच झंगमू, ग्यातसा, झोंगडा, जियुक्सु आणि लॅन्झेन अशी उपधरणे आणि जलविद्युत प्रकल्प उभे राहात आहेत. या प्रकल्पांमुळे भारत आणि बांगलादेशमधून वाहणा-या ब्रह्मपुत्रेच्या पाण्याच्या साठ्यात कोणताही बदल होणार नाही, असे आश्वासन चीनने दिले आहे. subansiri lower dam चीनचे आश्वासन म्हणजे चिनी मालच. त्यावर विश्वास कसा ठेवणार? या सर्व बाबतीत चीनने कमालीची गुप्तता पाळली आहे.
subansiri lower dam विशेष म्हणजे झंगमू धरण बांधले जात असलेल्या ठिकाणी ही नदी एका महाकाय धबधब्यानंतर वळण घेते आणि भारतात प्रवेश करते. हा धबधबा तब्बल २७०० मीटर उंचीचा आहे. इथे ६० हजार मेगावॅटचा महाकाय जलविद्युत निर्मिती प्रकल्प चीन बांधतोय. एक संशय असा व्यक्त केला जातोय की, चीनच्या उत्तरेकडचा भाग दुष्काळी तहानलेला आहे. तिथे नदीचा प्रवाह वळवला जाईल. याचे भूराजकीय परिणाम भीषण आहेत. subansiri lower dam यामुळे भारतात येणारे पाणी एकदम कमी होऊ शकते अथवा कृत्रिमरीत्या प्रचंड वाढू शकते. भारत आणि चीनमधील पाण्याच्या वापरासंबंधीचे संघर्ष जुने आहेत. त्यात अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्रथम हे समजून घेतले पाहिजे की, ज्या ब्रह्मपुत्रेवर समग्र ईशान्य भारत पोसला जातो त्याचे ५० टक्के सुपीक खोरे चीनमध्ये आहे. भारताला मिळणाèया एकूण पाणी पुरवठ्यापैकी ३० टक्के पाणी आणि ४० टक्के जलविद्युत निर्मिती ही एकट्या ब्रह्मपुत्रेमुळे होते. तसे पाहिले तर चीनला ब्रह्मपुत्रा आता फारशी लाभदायी नाही. subansiri lower dam पण तिबेटसाठी ती जीवनवाहिनी आहे. म्हणूनच चीन त्यावरील नियंत्रणाची राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये जे महत्त्व गंगेला आहे, तेच महत्त्व तिबेटमधून वाहणा-या ब्रह्मपुत्रेला आहे. subansiri lower dam कृषी, उद्योग, वीजनिर्मिती अशा अनेक बाबतीत ब्रह्मपुत्रा तिबेटसाठी वरदान आहे. चीन खोडसाळपणे अरुणाचलमधील काही भागावर जैव विविधतेमुळे नव्हे तर ब्रह्मपुत्रेवर नियंत्रण असल्यामुळे हक्क सांगतो.
नद्या वळवणे, पर्यावरणाचा नाश करणे हे चीनसाठी नवे नाही. subansiri lower dam यांगत्झे नदीचा प्रवाह तृषार्थ अशा दक्षिण चीनमध्ये वळवण्यासाठी चीनने तब्बल १२६४ किलोमीटर पर्यावरणाचा नाश केल्याचे समोर आले आहे. सीमा आणि पाणीवाटप या बाबतीत चीनचा संघर्ष फक्त भारताशी नाही तर युनान आणि मीकाँग नद्यांवरचे महाकाय प्रकल्प आणि बदललेले नदी प्रवाह यामुळे लाओस, व्हिएतनाम, कंबोडिया, म्यानमार यांच्याशी चीनचा सतत संघर्ष सुरू आहे. subansiri lower dam मग भारत काय करतोय? जागतिक बँकेच्या एका रिपोर्टनुसार ब्रह्मपुत्रेच्या संपन्न खो-यामध्ये एकूण ५२ उपनद्या आहेत. या भागात पाऊस उत्तम पडतो आणि हे सर्व ब्रह्मपुत्रेला अधिक समृद्ध बनवते. त्यातील पाणीसाठा वाढवते. त्यामुळे ब्रह्मपुत्रा जशी जीवनदायिनी आहे तशीच विनाशिनीचे रूपही धारण करते. त्यामुळे दरवर्षी येणा-या पुरातून प्रचंड प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होते. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचे हजारो कोटी रुपये खर्च पडतात. subansiri lower dam पूरबाधितांची सुटका आणि पुनर्वसन ही खूप जिकिरीची बाब आहे. इतक्या प्रचंड वेगाने डोंगरद-यांमधून वाहणारी ही नदी जलविद्युत निर्मितीसाठी फार मोठी संधीदेखील आहे.
subansiri lower dam लक्षात घ्या, दरडोई विजेचा वापर हे तुम्ही किती विकसित आहात, याचा मानदंड असतो. तुमची दरडोई वीजनिर्मिती क्षमता हे देश म्हणून तुमच्या सामर्थ्याचे लक्षण असते. आज भारतात दरडोई केवळ ११८१ किलोवॅट वीजवापर होतो. चीनमध्ये हा आकडा ४७१० किलोवॅट आहे तर अमेरिकेत १२००० किलोवॅट. आजही भारतात प्रामुख्याने वीजनिर्मिती आणि पुरवठा हा थर्मल पॉवर प्लांटमधून होतो. त्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढते. यातून निर्माण होणारी एक किलोवॅट वीज म्हणजे तब्बल ०.८५ किलोग्रॅम कार्बनडाय ऑक्साईड. subansiri lower dam कार्बन उत्सर्जनात चीन प्रथम क्रमांकावर आहे तर अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक तिसरा आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारतावर मोठा आंतरराष्ट्रीय दबाव आहे. अनेक विकसित राष्ट्रांनी आपला विकास साधताना पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवले आणि हेच देश भारताला पर्यावरणाच्या नियमात जखडू पाहत आहेत.जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपली विजेची गरज दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. subansiri lower dam थर्मल विद्युत प्रकल्पात लागणारा कोळसा, त्याचे मर्यादित साठे आणि उत्सर्जन याचा प्रश्न सौर ऊर्जा आणि वा-यापासून विद्युत प्रकल्पांची मर्यादा लक्षात घेता जलविद्युत प्रकल्प हाच सर्वात उत्तम, किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही मार्ग आहे. सौरशेतीमुळे गावं, संस्कृती वसल्याचे दिसत नाही. subansiri lower dam परंतु एका कोयनानगर जलविद्युत प्रकल्पामुळे इथे एक संपन्न पंचक्रोशी विकसित झालेली दिसते.
आज ब्रह्मपुत्रेचे खोरे हे वीज निर्मितीसाठी एक विलक्षण संधी घेऊन उभे आहे. subansiri lower dam पण चीन पाण्याचा प्रवाह नियंत्रित करून भारतात विनाश घडवू शकतो. अशा वेळी या खो-यात उभा राहणारा सुबांसरी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आणि गेमचेंजर ठरणार आहे. तब्बल २२०० मेगावॅटचा हा प्रकल्प आता पूर्णत्वाला जात आहे. या धरणाचा इतिहास दुर्दैवी आहे. subansiri lower dam पुष्कळ अभ्यास केल्यानंतर २००५ मध्ये याची संकल्पना प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली. हजारो कोटी रुपये त्यात खर्च झाले. पुढे पर्यावरणवादी आणि स्थानिकांमधील संघर्षामुळे हा प्रकल्प थांबवला गेला तो जवळपास एक दशकभर. २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत आल्यावर मोदी सरकारने गतिमान पावले टाकीत अत्यंत खंबीरपणे या धरणाचे उर्वरित काम तातडीने करण्यासाठी एनएचपीसीला जबाबदारी दिली. subansiri lower dam लक्षात घ्या, हा प्रकल्प हाती आला तेव्हा १० वर्षांपूर्वीची धरणाची डिझाईन्स अथवा इतर कोणत्याही बाबी उपलब्ध नव्हत्या. तिथले हवामान, नदीचे प्रवाह, पावसाचे प्रचंड प्रमाण यामुळे हे सर्व खूपच कष्टप्रद आणि जिकिरीचे बनले. पुढच्या काही दिवसात हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा कोयनानगर आणि भाकरा नांगलपेक्षाही मोठा जलविद्युत प्रकल्प असेल.
subansiri lower dam एका बाजूला अरुणाचल प्रदेश अन् दुस-या बाजूला आसाम. प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे एप्रिल मध्य ते नोव्हेंबर या काळात इथे काम करता येत नाही. मोठमोठी जनित्रे चालवण्यासाठी, पाण्याचे प्रचंड प्रवाह वाहून नेण्यासाठी खणल्या जाणा-या बोगद्यांमुळे तिथली जमीन अत्यंत भुसभुशीत आहे. त्यामुळे कामाच्या गतीवर परिणाम होतो. एक ना दोन, अक्षरश: हजारो अडचणी येतात. त्यामुळे प्रत्यक्ष साईटवर डिझाईनमध्ये खूप बदल करावे लागतात. subansiri lower dam यासाठी शेकडो तज्ज्ञ इंजिनीअर्स आणि हजारो कर्मचारी दिवसरात्र घाम गाळत आहेत, रक्ताचं पाणी करीत आहेत. १५ एप्रिलपर्यंत हे काम पूर्णत्वाला न्यावे लागणार आहे. कारण त्यानंतर तिथे पावसाला सुरुवात होते आणि नदीचा प्रवाह इतका वेगवान असतो की, वाटेत येणारे सर्व काही उद्ध्वस्त करतो. त्यामुळे अक्षरश: कामगारांची एक-एक शिफ्ट प्रत्येक बारीकसारीक गोष्ट डोळ्यात तेल घालून अत्यंत शास्त्रोक्तरीत्या पाहावी लागते. subansiri lower dam प्रकल्पाच्या देखरेखीसाठी अत्यंत प्रगत अशा संगणकीय व्यवस्था आणि प्रकल्प व्यवस्थापनाचे अत्याधुनिक सॉफ्टवेअर इथे पाहायला, वापरायला मिळत आहे. हा प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊन कार्यरत झाल्यास सर्वप्रथम अरुणाचल, आसाममधल्या महापुराची तीव्रता कमी होईल आणि वीजनिर्मितीतून महाराष्ट्र परिसरालाही वीजपुरवठा होईल. subansiri lower dam यामुळे सुबांसरी लोअर हा जलविद्युत प्रकल्प भारतमातेचा मुकुटमणी ठरणार आहे.