रावेर : तालुक्यातील के-हाळा बुद्रुक येथे गोवंशाचे मांस खुल्या जागेत विक्री करणाऱ्या एका इसमावर रावेर पोलिसांनी कारवाई करत अटक केली. त्याच्याकडे सुमारे एक क्विंटल गोवंश मांस मिळून आले. या बाबत रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील के-हाळा बुद्रुक गावी एक इसम गोवंश जातीच्या गुरांचे मांस अवैधरित्या विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिस निरिक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार तांबे यांनी आज रविवारी एक पोलिस पथक तयार करून छापा टाकला. दरम्यान, नामे शेख पिरु शेख लाल (वय ५५ रा कुरेशीवाडा रसलपुर) हा गोवंश गुरांचे मास बाळगून त्याची अवैध विक्री करताना रंगेहात मिळून आला. त्याच्याकडे बाविस हजार रुपये किमतीचे ११० किलो मांस आढळून आले. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप काळे यांनी केलेल्या तपासणी ते मांस गोवंशाचे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोहेकॉ सुनिल वंजारी, नितीन डांबरे, योगेश महाजन,पो.कॉ.राहुल परदेशी यांनी ही कारवाई केली आहे. पोकॉ श्रावण भील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.