Pachora Crime : गुन्हेगारीला आळा बसणार, पोलिसांकडून कारवाया सुरु, पाचोऱ्यात २० तलवारीसह एकाला अटक

---Advertisement---

 

जळगाव : अवघ्या दोन दिवसांपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी कारवाया केल्या जात आहे. दरम्यान, पाचोऱ्यात विनापरवाना अवैधरीत्या शस्त्रांचा साठा करून विक्रीसाठी आलेल्या एकाला २० तलवारीसह अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात विनापरवाना अवैधरीत्या शस्त्रांचा साठा करून विक्री करण्यासाठी आलेल्या केले तरुणाला पोलिसांनी कारवाई करत २० तलवारींसह त्याला अटक केली आहे.

पाचोरा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पाचोरा येथील माहिजी नाका परिसरातून सोहेल शेख तय्यूब शेख याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने तलवारी विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.

त्याच्याकडून लपवून ठेवलेल्या ठिकाणाहून एकूण २० तलवारी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ५४,००० रुपये इतकी आहे. तसेच काही तलवारी त्याने आधीच विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा पकडल्यामुळे पुढील घातपाताची एक मोठा धोका टळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---