---Advertisement---

उसनवारीच्या पैशांवरून तरुणाला मारहाण, जळगावातील घटना

---Advertisement---

जळगाव : उसनवारीने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एका तरूणाला तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना साई पॅलेस हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रजनीश चंद्रकांत पाटील (वय २२ रा. बिबा नगर, जळगाव) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी १४ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास रजनीश पाटील हा साई पॅलेस हॉटेल येथील बाकड्यावर बसलेला होता.

त्यावेळी उसनवारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चेतन भिकन कोळी, विनोद भिकन कोळी आणि त्यांचा अनोळखी मित्र सर्व राहणार बांभोरी ता. धरणगाव यांनी रजनीश याला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच डोक्यावर दगड मारून दुखापत केली.

याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक विजय निकम हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---