धरणगांव : तालुका विधी सेवा समिती व धरणगांव तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत एक कोटी आठ लाख अठ्ठयांनऊ हजार रूपयांची वसुली करण्यात आली. तसेच 69 न्यायालयीन प्रकरणे तसेच 548 वाद पुर्ण अशी एकूण 617 प्रकरणे निकाली निघाले.
पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश आशिष सुर्यवंशी तर पंच म्हणून ॲड.रावसाहेब निकुंभ यांनी कामकाज पाहीले. लोकअदालतीला धरणगांव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. महेंद्र चौधरी, उपाध्यक्ष ॲड. संजय महाजन, सचिव ॲड.गणेश मांडगे,सहसचिव ॲड. प्रदीप पाटील तसेच वकील संघाचे सर्व सदस्य, सर्व ज्युनीयर तसेच सिनीयर वकील उपस्थित होते. लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन अधिक्षक, कर्मचारी यांनी सहकार्य केले.