---Advertisement---
जळगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समिच्या वतीने बुधवारी (२ जुलै ) जळगाव परिमंडळा समोर द्वार सभा घेण्यात आली. या सभेत बुधवारी ( ९ जुलै ) रोजी विविध मागण्यांसाठी एकदिवशीय संप पुकारण्याचा ठराव एका मताने पास करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने वीज उद्योगांचे खाजगीकरण व कंत्राटी पद्धतीने तसेच समांतर वीज वितरणासाठी खाजगी उद्योगांना प्रवेश देण्यास विरोध दर्शविण्यात येणार आहे. याकरीता ९ जुलै २०२५ रोजी एकदिवसीय संप पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर द्वार सभा घेऊन निषेध नोंदविला आहे.
---Advertisement---
द्वार सभेला कृती समितीत समाविष्ठ असलेल्या संघटनांचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संखेने हजर होते. पारेषण तर्फे SEAचे श्री. चौधरी व पवन वाघुळदे , तांत्रिक कामगार युनियन ५०५९ झोन सचिव प्रदिप पाटील, वर्कर्स फेडरेशन सर्कल सचिव जितेंद्र अस्वार , महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटना सर्कल सचिव नितीन रामकुअंर यांनी मनोगत व्यक्त केले . रामकुअर यांनी सुत्रसंचालन केले तर झोन सह सचिव ५०५९ संजीव बारी यांनी आभार मानले.
अशा आहेत मागण्या
केन्द्र व राज्य सरकारांच्या वीज उद्योगाच्या खाजगीकरण धोरणाविरुध्द ९ जुलै २५ रोजी राज्यव्यापी एकदिवसीय संप पुकारण्यात आला आहे. यात समांतर वीज परवाना, प्रिपेड स्मार्ट मिटर, ३२९ सबस्टेशनचे खाजगीकरण कंत्राटीकरण माध्यमाने महावितरण व महापारेषण कंपन्याचे अस्तित्व धोक्यात आणण्याच्या पंडयंत्राविरुध्द, महावितरण व महापारेषण कंपनीच्या पुर्नरचनेच्या प्रस्तावाच्या विरोधात. २०१९ नंतर मंजूर झालेल्या उपकेन्द्रात स्टाफ मंजूर करा. सर्व कर्मचारी, अभियंत्याच्या पेन्शन योजनेकरीता
४३ हजार कंत्राटी-वाहयस्त्रोत कर्मचाऱ्यांना योग्य वेतन श्रेणीत सामावून घेण्यास्तव ४० हजार रिक्त पदावर भरती व वर्ग १ ते ४ मधील मागसवर्गीय अनुशेष भरून काढण्यास्तव. तिन्ही कंपन्यातील बदली धोरण व महानिर्मिती कंपनीतील भरती व सेवाशर्तीमधे एकतर्फी बदला विरुध्द आदी मागण्यांकरिता हा एकदिवशीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे .