---Advertisement---

दुर्दैवी ! धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी निघाले, पण नियतीच्या मनात होते काही औरच

---Advertisement---

धुळे : नवादेवी धबधब्याकडे जाताना नियंत्रण सुटल्याने दुचाकी नदीत कोसळून, झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाले. बोराडी येथील अंबाड नदीच्या वळणावर समोरून अचानक वाहन आल्यामुळे हा अपघात झाला. विनय संजय माळी (वय १८, रा. दहिवद) असे मयताचे नाव आहे तर नितीन भागवत गवळी (१९) व जयेश गवळी (१८) हे जखमी झाले आहेत.

पावसाळ्यातील पर्यटनस्थळ असलेल्या नवादेवी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी दहिवद येथील तरुण पाच-सहा दुचाकींवरून निघाले होते. अंबाड नाल्याच्या वळणावर समोरून अचानक वाहन आले, ज्यामुळे दुचाकीचे नियंत्रण सुटले व एम. एच. १८, सी. बी. ७६५३ क्रमांकाची दुचाकी थेट नदीपात्रात कोसळली.

या दुचाकीवर तीन मित्र प्रवास करत होते. त्यापैकी १८ वर्षीय विनय संजय माळी याचा चेहरा मोठ्या दगडावर आदळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर नितीन भागवत गवळी (वय १९) याला कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. जयेश गवळी (वय १८) हा बाजूला फेकल्यामुळे किरकोळ जखमी झाला. तीनही जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---