---Advertisement---
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा येथे देवीच्या मूर्ती ठेवण्यावरून वाद झाला. या वादातून राणा मनमौजदार पवार (वय ४५) यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी मीनाक्षी राणा पवार यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीतील माहितीनुसार, देवीच्या मूर्ती ठेवण्यावरून झालेल्या वादात काही जणांनी एकत्र येऊन हातात कुऱ्हाड, लोखंडी रॉड, आसारी व लाठ्याकाठ्या घेऊन फिर्यादी व इतर साक्षीदारांवर हल्ला चढवला. यामध्ये गुरुदीप जिलीशबाबू पवार याने फिर्यादीच्या पतीच्या डोक्याच्या मागच्या बाजूस कुन्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले, यात त्यांचा मृत्यू झाला.
घटनेत संशयित गुरुदीप जिलीशबाबू पवार, राजेंद्र बाबू सिगरेटबाबू पवार, क्रिश राजेंद्रबाबू पवार, दीपक जिलीशबाबू पवार, जिलीशबाबू कोनानी पवार, शक्तीकपूर सिगरेटबाबू पवार, शिवकपूर शक्तीकपूर पवार, लताबाई शक्तीकपूर पवार, अनुलेखा दीपक पवार व इतर दोन-तीन व्यक्तींचा समावेश आहे.
या प्रकरणी संबंधित संशयितांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवणे, मारहाण करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न व हत्या अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ तपास करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण लालगोटा गावात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. तपास पोलीस प्रशासन करत असून, संशयितांना तत्काळ अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे.