Jalgaon Crime : पोलिसांच्या तावडीतून निसटले अन् गाठली दिल्ली, अखेर एकाला अटक

---Advertisement---

 

जळगाव : पोलिसांच्या तावडीतून बेड्यांसह फरार झालेल्या दोन गुन्हेगारांपैकी अमजद फकिरा कुरेशी (रा. मेहरूण, जळगाव) याला अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली येथे अटक केली आहे.

गुरे चोरी प्रकरणात जळगाव येथून चार संशयितांना अमळनेर येथे चौकशीसाठी आणले जात असताना, चांदणी कुन्हे येथील रेल्वे बोगद्यात वाहनाची गती कमी झाल्याचा फायदा घेत दोन आरोपींनी बेड्यांसह गाडीतून उडी मारून पलायन केले होते. या घटनेनंतर आरोपींना आणणाऱ्या चारही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

तांत्रिक पुरावे व शोधमोहिमेच्या आधारे अमजद कुरेशी दिल्ली येथे लपल्याचे समोर आले. एलसीबी पथकाने दिल्ली गाठत त्याला अटक करून अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

घरफोडी, ऐवज लंपास

सारबेटे, ता. अमळनेर येथे दोन घरे फोडून दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. २८ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. भीमराव पुना पाटील (वय ६४) रा. सारबेटे खुर्द हे भडगाव येथे गेले होते. त्यांच्या घरी आणि त्यांचे शेजारी भालचंद्र मूलचंद पाटील यांच्या घरी चोरी झाल्याचे त्यांना पुतण्या नितीन पाटील यांनी कळवले.

यात भीमराव पाटील यांच्या घरातून सोन्याची साखळी, पोत, अंगठी, कानातले टोंगल, किल्लू असे सोन्याचे दागिने तर २९ भार वजनाचे करदोडा, वाळा, कमरपट्टा, देवीची मूर्ती व रोख १५ हजार रोख तर भालचंद्र मूलचंद पाटील यांच्या घरातील ६ ग्रॅम बाळ्या असा एकूण २ लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी चोरून नेला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---