---Advertisement---

पाचोऱ्यात एकाला जबर मारहाण; चौघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

---Advertisement---

पाचोरा : शहरातील दर्श कृषी सेवा केंद्र , प्रकाश टॉकीज जवळ एकाला चार जणांनी जबर मारहाण केली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .

पाचोरा पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप एकनाथ चौधरी आणि  (रा.माहेजी नाका, परधाडे रोड) हा ७ जुलै रोजी रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास शहरातील आदर्श कृषी सेवा केंद्र ,प्रकाश टॉकीज जवळ जमलेली गर्दी दिसल्याने थांबला.

दरम्यान, आकाश राजेंद्र पाटील, विकी राजेंद्र पाटील, राजेंद्र पंडित पाटील, राहुल पाटील (सर्व रा.भारतीया नगर) यांनी फिर्यादिस शिवीगाळ करीत ठोष्या बुक्क्यांनी मारहाण केली.  आकाश पाटील याने त्याच्या हातातील लोखंडी फिर्यादीच्या हाताच्या अंगुठ्या वर मारहाण करून फॅक्चर केले.

याबाबत फिर्यादी संदीप चौधरी याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना पाचोरा पोलिसांना फ्र्याद दिल्याने वरील चौघा आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment