ONGC मार्फत 2500 जागांसाठी बंपर भरती; 10वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात..
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात (ONGC) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ONGC ने काही रिक्त जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.. त्यानुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ONGC च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 सप्टेंबर 2023 असून पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
एकूण जागा : 2500
विभागीय रिक्त पदे :
1) उत्तर विभाग 159
2) मुंबई विभाग 436
3) पश्चिम विभाग 732
4) पूर्व विभाग 593
5) दक्षिण विभाग 378
6) मध्य विभाग 202
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण/ 12वी उत्तीर्ण / ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E/MLT)/
टेक्निशियन अप्रेंटिस: सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अॅप्रेंटिस पदावरील नियुक्तीसाठी निवड जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे मोजलेल्या गुणवत्तेवर आधारित असेल. समान संख्येची पात्रता असल्यास, वृद्ध व्यक्तीचा विचार केला जाईल.
तुम्हाला किती पगार मिळेल?
पदवीधर अप्रेंटिस – 9,000/-
ट्रेड अप्रेंटिस: 8,000/
टेक्निशियन अप्रेंटिस: 7,000/-
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : येथे क्लीक करा