तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमीचा आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये तब्बल 2236 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. विशेष म्हणजेच या भरतीसाठी दहावी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवाराने आपले अर्ज NAPS पोर्टल apprenticeshipindia.gov.in किंवा NATS पोर्टल nats.education.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२४ आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करावं.
पदाचे नाव : ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता :
ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)
या भरतीसाठी १८ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. या अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. यासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ई मेल आयडीवर याबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.
इतके स्टायपेंड मिळेल?
या अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ९ हजार रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. आयटीआय पदवी प्राप्त उमेदवारांनी ८०५० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. तसेच ट्रेड अप्रेंटिससाठी ७००० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
जाहिरात पहा : Click Here