---Advertisement---
उत्तरप्रदेशातील हिंसाचाराचा न्यायालयीन चौकशी अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सादर करण्यात आlला. संभलमध्ये केवळ १५ ते २० टक्के हिंदू राहिले आहेत. असा खळबळजनक दावा या अहवालात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपाने या लोकसंख्या बदलाला देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. सपाच्या पीडीएसमोर भाजपाची कोणतीही युक्ती टिकणार नाही, असे विरोधकांनी आव्हान दिले आहे.
उत्तरप्रदेशचे प्रधान सचिव संजय प्रसाद सांगितले की, संभल हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या समितीने गुरुवारी मुख्यमंत्री योगी यांना अहवाल सादर केलो. त्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. त्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतस्व यावर बोलता पेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तीन सदस्यीय चौकशी आयोगाने मुख्यमंत्र्यांना सुमारे ४५० पानांचा सविस्तर आणि गोपनीय अहवाल सादर केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहवालात संभलमध्ये हिंदूंची लोकसंख्पा देखील नमूद करण्यात आली आहे. संभलमध्ये हिंदू लोकसंख्या १५-२० टक्के आणि मुस्लिम लोकसंख्या ८०-८५ टक्के असत्याचा दावा करण्यात आला.
चौकशी अहवालात एक मोठा खुलासा करण्यात आता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यात म्हटले की, २२ नोव्हेंबर २०२४ रोजी खासदार जिया-उर-रहमान बर्क यांच्या वादग्रस्त भाषणामुळे हिंसेचा पाया रचला गेला. त्यांनी केलेली विधाने प्रक्षोभक होती. पानंतरच संघर्ष पेटला. या संपूर्ण कटात जिया-उर-रहमान बर्क, सोहेल इक्बाल आणि इंतेजामिया समितीचे पदाधिकारी प्रमुख भूमिकेत होते. अशी चर्चा आहे.
भाजपा प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले की, सुरक्षा हा मानवी जीवनासाठी सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. जिथे जिथे सुरक्षेचा अभाव जाणवतो, तिथून लोक स्थलांतर करतात. ज्या प्रकारे संभलमध्ये वारंवार दंगली झाल्या आणि या दंगलींमध्ये मोठ्या संख्येने हिंदूंची कतल झाली, त्यामुळेच मोठ्या संख्येने हिंदू स्थलांतरित झाले आहेत, असा आरोप त्यांनी केला.









