---Advertisement---

Operation Sindoor: भुसावळ रेल्वे विभागाद्वारे “ऑपरेशन सिंदूर” सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली

---Advertisement---

Operation Sindoor: “ऑपरेशन सिंदूर” या शौर्यपूर्ण मोहिमेच्या सन्मानार्थ आज दिनांक १८ मे २०२५ रोजी भुसावळ रेल्वे विभागात सकाळी ०७:०० वाजता विभागीय भुसावळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालय येथून एक भव्य व सुसंगत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीच्या भावनेने भारलेले वातावरण मार्चदरम्यान अनुभवायला मिळाले.

या तिरंगा रॅलीचे नेतृत्व भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी केले, यामध्ये रेल्वे अधिकारी, कर्मचारी, क्रीडापटू, स्काऊट्स अँड गाईड्स, सिव्हिल डिफेन्स संघ, सेंट जॉन अँम्ब्युलन्स सेवा, रेल्वे शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. भुसावळ रेल्वे स्थानकावर ही तिरंगा रॅली देशभक्तिपर घोषणांनी समाप्त झाली. रेल्वे स्थानक परिसर राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला व उपस्थित नागरिक व रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिरंग्याला अभिवादन केले. “ऑपरेशन सिंदूर”मधील शौर्याला मानवंदना वाहणे व रेल्वे कुटुंब व समाजामध्ये ऐक्यभावना दृढ करणे, हे या तिरंगा रॅलीचे मुख्य उद्दिष्ट होते.

चित्रकला स्पर्धा उत्साहात

शालेय विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, देशभक्ती आणि भारतीय रेल्वेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात “मेरा अमृत स्टेशन” व “ऑपरेशन सिंदूर की मिसाल” या विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

ही स्पर्धा दिनांक 14/05/2025 रोजी भुसावळ येथील हेरिटेज रेल्वे संग्रहालयात पार पडली, ज्यामध्ये एकूण 22 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यानंतर दिनांक 16/05/2025 रोजी भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये एकूण 51 उत्साही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या कल्पनाशक्ती, कलाकौशल्य आणि देशप्रेमाची बहारदार मांडणी केली.

“मेरा अमृत स्टेशन” या विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी स्थानकांचा ऐतिहासिक वारसा, आधुनिकिकरण आणि झालेल्या परिवर्तनाचा सुंदर चित्रद्वारे आलेख सादर केला. तर “ऑपरेशन सिंदूर की मिसाल” या विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेचा गौरव करणारी, शूर सैनिकांना व शहीदांना मानवंदना देणारी चित्रे सादर करून, राष्ट्रीय एकता, देशभक्ती आणि स्वच्छतेसारख्या मूल्यांना उजाळा दिला.

भुसावळ विभागाने सर्व सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून, सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट चित्र सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांच्या योगदानाची दखल घेतली गेली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment