---Advertisement---

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर चीनचं मोठं वक्तव्य, म्हणे…

---Advertisement---

China on Operation Sindoor: भारतीय सैन्याने पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर ६-७ मे च्या रात्री हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात नऊ दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहे.

दरम्यान, चीनने भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबाबत एक निवेदन दिले आहे. भारताच्या लष्करी कारवाईवर चीनने आक्षेप व्यक्त केला आहे आणि ते खेदजनक असल्याचं म्हटले आहे. चीनने म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण होत आहे त्याबद्दल आम्हाला चिंता आहे.

भारताच्या कारवाईनंतर, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता आहे. भारत आणि पाकिस्तान हे नेहमीच एकमेकांचे शेजारी आहेत आणि राहतील. ते दोन्ही चीनचे देखील शेजारी आहेत.” पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा स्पष्ट उल्लेख करतांना त्यांनी म्हटले की, “चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो.”

पुढे निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही दोन्ही बाजूंना शांतता आणि स्थिरतेच्या व्यापक हितासाठी काम करण्याचे, शांतता राखण्याचे, संयम बाळगण्याचे आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनवू शकेल अशा कृती टाळण्याचे आवाहन करतो.” या निवेदनात चीनने म्हटले की, “आज सकाळी भारताने केलेली लष्करी कारवाई चीनच्या दृष्टीने खेदजनक आहे.”

कोणत्या अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आले?

पाकिस्तानमधील बहावलपूर आणि मुरीदके हे दहशतवादी तळ निशाण्यावर होते. बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे मुख्य तळ होते. तर लाहोरचे मुरीदके हे लश्कर ए तोयबाचे तळ होते. भारतानं एअर स्ट्राइक करताना कुठल्याही सैन्याच्या ठिकाणाला टार्गेट केलेले नाही. तर नागरिकांनाही कोणताही धोका पोहोचलेला नाही. दहशतवादी गटांचे तळ हेच हवाई दलाच्या निशाण्यावर होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment