---Advertisement---
Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यात पाकिस्तानसह POK येथील दहशतवादी तळांना लक्ष करण्यात आले होते. भारतीय सैन्याच्या या यशस्वी कामगिरीनिमीत्त देशभरात शुक्रवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली.
दरम्यान भारतीय सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी सोमवार रोजी आमखेडा,सह सोयगाव शहरात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. हि तिरंगा यात्रा श्री.विठ्ठल मंदिरा पासून सुरू होऊन आमखेडा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वाल्मिक नगर,छत्रपती शिवाजी महाराज चौक,बस स्थानक मार्ग श्री.विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाली.
या तिरंगा यात्रेत माजी सैनिक गणेश जावळे, शशीकांत काळे,सिताराम पाटील सहभागी झाले होते तसेच त्याचा सत्कार करण्यात आला. माजी सैनिक सिताराम पाटील,पुष्पाताई काळे यांनी मनोगत व्यक्त केले.या तिरंगा पदयात्रेत सुरेश बनकर,ज्ञानेश्वर मोठे,पुष्पाताई काळे,जयप्रकाश चोव्हाण,संजय पाटील,बद्री राठोड,वसंत बनकर,योगेश पाटील,सुनिल गव्हाडे,राहुल राठोड,सुनील ठोंबरे,मयुर मनगटे,दिपक पाटील,मोतीलाल वाघ,दिलीप पाटील,विशाल गिरी,संजीवन सोनावणे,राहुल गिरी,संजय चौधरी,संजय मंडवे,दगडू आस्वार,संजय तायडे,मानस झंवर,अनिस तडवी,आनंदा इंगळे,वंदना पाटील,नंदा आगे,निलिमा पवार,लक्ष्मीबाई पाटील,ईश्वर शिरसागार,बाळू पाटील,संजय आगे,अरुण सोहनी, संजय तायडे,निलेश नागपुरे,किरण पाटील,गजानन शिरसाठ,आनंदा इंगळे आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन राहुल राठोड यांनी केले.