Operation Sindoor: भारतीय जवानांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील ज्या नऊ ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्यापैकी एक ठिकाण बहावलपूर आहे. ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवे कुटुंबाच उद्ध्वस्त झाले आहे. त्याच्या कुटुंबातील दहा सदस्यांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, मसूद अझहरचे एक स्टेटमेंट समोर आले आहे. ऑपरेशन सिंदूर मोहिमेंतर्गत झालेल्या हवाई हल्ल्यात अझहरच्या परिवारातील १० आणि जवळचे ४ लोक ठार झाले आहेत. हे पाहन मसूद अझहरने मी ही मेलो असतो बरे झाले असते. या हल्ल्यात शेकडो दहशतवादी ठार झाले आहेत.

भारतीय हवाई हल्लयात मसूद अजहरची बहिण देखील ठार झाली. दहशतवाद्यांचे नातेवाईक देखील हल्ल्यात मारले गेले आहेत. जैश-ए-मोहम्मदने स्टेटमेंट जारी करत सांगितले आहे की, मसूद अझहरची मोठी बहीण ठार झाली. तर मुफ्ती अब्दुल रऊफची नातवंडे, मोठ्या मुलीचे ४ मुले जखमी झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये अधिकतर महिला आणि मुलांचा समावेश आहे.

स्थानिक पत्रकाराने म्हटले की, रात्री जेव्हा पहिला धमाका ऐकू आला तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले. काहीच वेळानंतर दुसरा धमाका ऐकू आला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, दोन किलोमीटर अंतरावरील घरांच्या खिडक्या फुटल्या.मध्यरात्री अचानक झालेल्या हल्ल्याने दहशतवादी तळाजवळ राहणारे नागरिक घाबरले आणि घराबाहेर पडले.