Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लास्करने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि pok मधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. यात १००हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने मारलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांची नावे उघड झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या हल्ल्यात ५ मोठे दहशतवादी मारले गेले. ऑपरेशन सिंदूरमध्ये अबू जुंदाल आणि मोहम्मद रौफ अझहरसह ५ दहशतवादी मारले गेले आहेत. मारल्या गेलेल्या या पाच दहशतवाद्यांची नावे आता समोर आली आहेत. या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
१) खालिद उर्फ अबू आकाशा
लष्कर-ए-तैयबा
जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यात सहभागी
अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्र तस्करीत सहभाग
२) मोहम्मद हसन खान
जैश-ए-मोहम्मद
मुफ्ती अजगर खान काश्मिरीचा मुलगा. POK मधील जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्यात महत्त्वाची भूमिका.
३) मुदस्सर खादियन खास ऊर्फ मुदस्सर, अबू जुंदाल
लष्कर-ए-तैयबा मुरीदकेमधील मर्कझ तैयबाचा प्रमुख
४) हाफीज मुहम्मद जमील
जैश-ए-मोहम्मद
मौलाना मसूद अजहरचा मेहुणा
बहावलपूरमधील मर्कझ सुभान अल्लाहचा प्रमुख
जैश-ए-मोहम्मदसाठी निधी गोळा करायचा.
५) मोहम्मद युसूफ अझहर उर्फ घोसी साहब, उर्फ उस्तादजी
जैश-ए-मोहम्मद
मौलाना मसूद अजहरचा मेहुणा
जैशच्या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र चालवण्याच प्रशिक्षण द्यायचा.
IC-814 अपहरण प्रकरणात वाँटेड