---Advertisement---

ऑपरेशन सिंदूरवर संसदेत होणार चर्चा, दोन्ही सभागृहांसाठी वेळ-तारीख निश्चित !

---Advertisement---

नवी दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर १६ तासांची चर्चा होणार असून, याची सुरवात २८ जुलैपासून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यात सहभागी होणार आहे.

सूत्रांनुसार, भारताच्या निवडणूक आयोगाच्या वतीने सरकार उत्तर देऊ शकत नाही. बिहारमधील मतदार यादीच्या पुनरावलोकनाचे काम सरकार करत नाही, तर निवडणूक आयोग करत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात एसआयआर आणि इतर काही मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही गतिरोध कायम राहिला.

सरकारने लोकसभेत दोन विधेयके केली सादर

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आंदोलन करणाऱ्या खासदारांना इशारा दिला की, सभागृहात फलक आणणाऱ्या सदस्यांवर कारवाई करावी लागेल. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले. त्यानंतर दुपारी २ वाजल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सरकारने लोकसभेत दोन विधेयके सादर केली.

उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्लागार समितीची बैठक

गदारोळाच्या दरम्यान, क्रीडामंत्र्यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक-२०२५ आणि राष्ट्रीय डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक-२०२५ सादर केले. दुसरीकडे, राज्यसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती हरिवंश यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये, विरोधकांनी पुढील आठवड्यापासून ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची आणि त्यात पंतप्रधान मोदींची उपस्थिती असण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही बैठकीला हजेरी लावली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---