तरुण भारत लाईव्ह । ५ ऑक्टोबर २०२३। oppo ने आपल्या ग्राहकांसाठी Oppo A18 स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. oppo A18 मध्ये काय धमाकेदार फीचर्स पहायला मिळणार आहे सोबतच या फोनची किंमत काय आहे यामध्ये कोणते कलर्स आपल्याला पहायला मिळणार आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
Oppo A18 मोबाइल सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध झाला असून यामध्ये आपल्याला ४जीबी रॅमसह ६४GB स्टोरेज मिळत आहे आणि ह्याची किंमत फक्त ९,९९९ रुपये आहे. फोन ग्लोइंग ब्लू आणि ग्लोइंग ब्लॅक अशा दोन रंगात आला आहे. फोनमध्ये पावर बॅकअपसाठी ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. अन्य फीचर्स पाहता डिवाइसमध्ये युजर्सना साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ब्लूटूथ ५.३, वाय-फाय, ३.५mm हेडफोन जॅक, यूएसबी टाइप पोर्ट सारखे फीचर्स मिळतात. हा नवीन ओप्पो लेटेस्ट अँड्रॉइड १३ वर चालतो.
फोनमध्ये ६.५६ इंचाचा एचडी प्लस LCD डिस्प्ले दिला आहे. जो ८९.८०% स्क्रीन टू बॉडी रेशियो, ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट, ९०हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, १६.७ बिलियन कलर आणि ७२० निट्झ पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. Oppo A18 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.