OPPO A38 भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

तरुण भारत लाईव्ह । १० सप्टेंबर २०२३। नुकताच बाजारात OPPO A38 हा मोबाईल लाँच झाला आहे. आता हा फोन भारतीयांच्या भेटीला आला आहे. OPPO A38 चे स्पेसिफिकेशन्स काय आहेत तसेच या फोनची किंमत काय आहे त्याचबरोबर हा फोन कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

OPPO A38 मध्ये ६.५६ इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा वॉटर ड्रॉप डिजाईन असलेला फोन ७२० x १६१२ पिक्सल रिजॉल्यूशन, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, ७२० निट्झ पीक ब्राइटनेस, १०० टक्के DCI P3 आणि १००% एसआरजीबी कलर गमटच्या सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. या मोबाईल मध्ये कंपनीनं हेलिओ जी८५ चिपसेटची पावर दिली आहे. तर ग्राफिक्ससाठी माली जी५२ एमसी२ जीपीयू आहे. त्याचबरोबर ४जीबी रॅम आणि १२८जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. रॅम वाढवण्यासाठी ४GB एक्सटेंडेड रॅमचा सपोर्ट आणि इंटरनल स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट मिळतो.

ओप्पोचा नवीन स्मार्टफोन मध्ये आपल्याला ४जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मिळते. फोनची विक्री १२,९९९ रुपयांमध्ये १३ सप्टेंबरपासून सुरु होईल. कंपनीनं हा फोन ग्लोइंग गोल्ड आणि ग्लोइंग ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन देखील मिळेल.