काँग्रेससह २० विरोधी पक्षांना सर्वोच्च दणका!

तरुण भारत लाईव्ह । महाराष्ट्र : सर्वोच्च न्यायालयाने सेंट्रल विस्टा प्रकरणात देशाच्या राष्ट्रपती द्वारा संसद भवनाचे उद्घाटन करण्याबाबत तसेच पंतप्रधान मोदींना या पासुन रोखण्यासाठी दाखल करणाऱ्या याचिका काँग्रेस कर्त्याला फटकारत ही याचिका फेटाळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वेषाने काँग्रेस नेते राहुल गांधीं यांना इतके पछाडले आहे की त्यांनी घेतलेला कोणताही निर्णय देशहिताच्या दृष्टीने असला तरी त्यात काही तरी खोट काढून पंतप्रधानांना लक्ष्य करणे हा त्यांचा नित्य उपक्रमच झाला आहे.

सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत नवीन संसद भवनाचे उद्घाटन येत्या २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांचा खरा तर ड्रीम प्रोजेक्ट आहे. गेल्या डिसेंबर २०२० पायाभरणी व जानेवारी २०२१ मध्ये बांधकामास सुरुवात झाल्यानंतर ही अवघ्या २८ महिन्यात याचे काम पूर्ण झाले. सध्याचं संसद भवन हे इंग्रजांनी बनविले होते त्याला जवळपास ९३ वर्षे झाली. आजपर्यंत काँग्रेसने पक्षाने सत्ता असताना देशातील पायाभूत तसेच सर्व सामान्यांच्या सुविधा कडे लक्ष दिलेच नाही तर नवीन संसद भवन काय उभे करणार?

हा प्रोजेक्ट जाहीर होताच या मध्ये अडचणी आणण्याचे काम मात्र पक्षातर्फे चालू होते. सर्वोच्च न्यायालयात ही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांने या विरुध्द याचिका दाखल केली होती ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने दंडा सहित फेटाळली होती ही गोष्ट वेगळी. पंतप्रधान मोदी म्हणतात ते खरे आहे काँग्रेस पक्षाने या आधी देशातील विकास कामे ठप्प करण्याचे काम केले. कांग्रेस पक्षाचा विश्वास फक्त विकास कार्यों को अटकाने, लटकाने और भटकाने में है म्हणूनच आता ही कारण नसतानाही संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती यांच्या हस्ते व्हावे अशी नवी मागणी त्यांनी केली आहे.

खरे तर विरोधाला विरोध नको ही भूमिका राजकारणात नको कारण आज विरोधी पक्षात असणारे उद्या सत्तेत बसु शकतात. आज देशाचा “अमृत महोत्सव” साजरा चालु असतांना हे नवीन संसद भवनाची वास्तू तयार होणे देशाच्या दृष्टीने निश्चितच कौतुकास्पद तसेच अभिमानाची आहे. पण आज दुर्दैवाची गोष्ट ही आहे की काँग्रेस पक्ष यात ही राजकारण करत आहे. देशातील सर्व सामान्य लोकांना काँग्रेस पक्षाच्या असल्या चाली रिती माहीत असल्याने गेल्या दहा वर्षांपासून केंद्रातून सत्ते बाहेर ठेवले आहे.