राज्यात मुसळधार, ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वाचा Weather Report

मुंबई:  हवामान खात्याकडून राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या २४ तासात कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवर पावासाचा जोर आणखी वाढणार असल्याचं हवमान विभागाने सांगितलं आहे. तसेच, राज्यातील ९ जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शनिवारी सकाळपासून मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतील दादर, लालबाग-परळसह वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरीवलीत रात्रभरापासून कोसळधार सुरु आहे. तर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्येही जोरदार पाऊस बरसतो आहे. त्याशिवाय, वसई, विरार, नवी मुंबईतील वाशी, पनवेल भागातही पावसाचा जोर वाढला आहे.

९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, नागपूर, अमरावती या ९ जिल्ह्यांना पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याशिवाय, संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आजचा पावसाचा अंदाज

अतिवृष्टी
रत्नागिरी, गडचिरोली

मुसळधार ते अतिमुसळधार
ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा

मुसळधार
मुंबई, पालघर, कोल्हापूर, पुणे

वादळी वाऱ्यासह पाऊस
धुळे, जळगाव, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ