---Advertisement---
Auri Grow India Limited : कृषी-तंत्रज्ञान आणि निर्यात क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणारी ऑरी ग्रो इंडिया लिमिटेड पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या केंद्रस्थानी आली आहे. हॉंगकाँगस्थित विदेशी संस्थागत गुंतवणूकदार ल्युमिनरी क्राऊन लिमिटेड यांनी कंपीनीत २४ टक्के हिस्सा खरेदी करणायचा प्रस्ताव दिला असून, संचालक मंडळाने या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी दिली आहे.
विशेष म्हणजे, ल्युमिनरी क्रोऊन लिमिटेड प्रति शेअर २ रुपये या दराने गुंतवणुकीची ऑफर दिली आहे, तर ३० डिसेंबर रोजी कंपीनीच शेअर भाव केवळ ०.८० रुपये होता. म्हणजेच सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत तब्बल १५० टक्के प्रीमियम देण्याची तयारी विदेशी गुंतवणूदारांनी दर्शवली आहे, ही बाब गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक मानली जात आहे.
बोर्डाने निधी उभारण्यासाठी राईट्स इशू या विविध पर्यायांचा अभयास करण्याचे अधिकार व्यवस्थापनाला दिले आहे. मात्र] या गुंतवणुकीनंतरही विदेशी कंपनीला नियंत्रण व बोर्डातील स्थान दिले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निधीमुळे तांदूळ निर्यात, हायड्रोपिनिक्स-ए प्रकल्प आणि सेंद्रिय शेती यावर भर देण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीची विक्री १६. ७६ कोटींवरून थेट १७५. ५५ कोटींवर पोहोचली असून , निव्वळ नफ्यातही मोठी वाढ झाली आहे.









