---Advertisement---
जळगाव : पारोळा तालुक्यातील टिटवी येथे २९ एप्रिल २०२५ रोजी एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. दरम्यान, तिच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप करीत त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी करत आहेत. मात्र , त्यांच्या दखल घेतली जात नसल्याने त्यांनी आजपासून (१५ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
फिर्यादी उत्तम भिमसिंग भिल यांनी त्यांची बहीण कविता राजू सोनवणे हिच्या संशयास्पद मृत्यूबाबत तक्रार केली आहे. त्यानुसार कविताला अपत्य नसल्यामुळे सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता, असा तिच्या माहेरच्या लोकांनी आरोप केला आहे.
शॉक लावून मारल्याचा आरोप
२९ एप्रिल २०२५ रोजी कविताला इलेक्ट्रिक शॉक लागल्याचे सांगण्यात आले, परंतु तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याने हा आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा प्रकार असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.
दरम्यान, तिच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप करीत त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी करत आहेत. मात्र , त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी आजपासून (१५ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
अन्यथा लोक संघर्ष मोर्चकडून आंदोलन
घटनेला पाच महिने उलटून देखील पीडित महिलेच्या माहेरच्या लोकांना न्याय मिळाला नाही. जर मयत कविताच्या सासरकडील मंडळींना अटक केली नाही तर लोकसंघर्ष मोर्चा काढून मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष यांनी दिला आहे.